| पुणे | प्रतिनिधी |
पुण्यात 27 वर्षीय परदेशी महिलेवर 7 जणांकडून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून, यात राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडे यासह इतरांचा समावेश आहे.
भूतानवरून पुण्यात शिक्षण आणि कामासाठी आलेल्या महिलेशी आधी ओळख करून तिच्याशी जवळीक साधत कुकडे याच्या मित्रांनी विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी शंतनु कुकडे याला काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी 2 मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली होती. मागील वर्षी या पदाधिकाऱ्याने पक्षातून राजीनामा दिला होता असं असलं तरी सुद्धा कुकडे विरोधात दोन्ही शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात आली होती. यावेळी सुद्धा कुकडे याच्या बँकेत किंबहुना त्याच्या संस्थेत विदेशातून पैसे येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. असे असताना आता कुकडे याच्याविरोधात 27 वर्षीय भूतानची रहिवासी असलेल्या एका महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणात कुकडे याच्या 6 मित्रांना सुद्धा अटक करण्यात आली आहे, यात एक डीजे तर एक जण वकील आहे.