ट्रक आणि दुचाकीचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

। अकोला । वृत्तसंस्था ।

अकोला-खामगाव राष्ट्रीय महामार्गावर आज (दि.6) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मालवाहू ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

नव्याने बांधण्यात आलेल्या अकोला-खामगाव या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. ट्रकला ओव्हरटेक करत असताना दुचाकीचे चाक या भेगांमधून गेले आणि अडकले. त्यामुळे दुचाकी स्लिप होऊन ट्रकवर आदळली. या अपघातात एक जण ट्रकच्या मागील चाकाखाली आला आणि त्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याला गंभीर दुखापत होऊन त्यालाही आपला जीव गमवावा लागला.

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी हजर होऊन महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. तसेच, या अपघाताप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version