| पनवेल | वार्ताहर |
दोन बालिकांवर अत्याचार झाल्याच्या घटना पनवेल पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत. यामधील पहिल्या घटनेत जन्मदात्यानेच 11 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची तक्रार पीडितेच्या आईने पोलिसांना दिली. तसेच दुसरी घटना पनवेलमधील एका वसाहतीमध्ये घडली. एका 12 वर्षांच्या बालिकेवर त्याच इमारतीमध्ये राहणार्या युवकाने अत्याचार केल्याची तक्रार पीडितेच्या आईने केली आहे. पीडितेची आई बाहेरगावी गेल्यावर पीडितेवर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पनवेल शहर पोलीसांनी पहिल्या घटनेतील पित्याला अटक केली आहे. पहिल्या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तसेच दुसर्या प्रकरणात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे.






