| पनवेल | वार्ताहर |
इमारतीच्या गच्चीची किल्ली न दिल्याने शेजार्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही हाणामारी एवढी जोरदार झाली की एकाने दुसर्या व्यक्तीच्या हाताला चावा घेतल्यानंतर ती व्यक्ती रक्तबंबाळ झाली. दोन महिला सुद्धा जखमी झाल्या. ही घटना कळंबोलीतील एका सोसायटीत घडली. गच्चीवर कुलूप असल्याने चावी मागितल्याने वादाला सुरुवात झाली. दोन्ही कुटुंबियांनी दिलेली परस्परविरोधी तक्रार नोंदविल्यामुळे भांडणाला कोणी सुरूवात केली याचा न्यायनिवाडा अद्याप पोलीस सुद्धा करु शकले नाहीत.