। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील रिसॉर्ट मालकांना धमकावून पैसे उकळणाऱ्या दोन तोतया पोलीस अधिकाऱ्यांना अखेर कर्जत पोलिसांनी गजाआड केले आहे. शुभम राऊत आणि समीर दुधासे अशी या दोघांची नावे असून, हे दोघे स्वतःला “जिल्हा पोलीस अधीक्षक” आणि “पोलीस निरीक्षक” असल्याचे सांगत रिसॉर्ट मालकांना फसवत होते.






