। पनवेल । प्रतिनिधी ।
ट्रकने कारला दिलेल्या धडकेत दोघेजण जखमी झाले. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ट्रक क्रमांक जी जे 32 व्ही 2023 वरील चालका विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ओमकार जगदीश घरत हे कोनगाव येथे राहत असून ते शुभम सुरेश घरत यांच्यासोबत कोन गाव येथून कासारभट, पनवेल येथे इनोवा क्रिस्टा कार क्रमांक एम एच 46 बीव्ही 76 75 घेऊन जात होते. चिंचवण पनवेल येथे चर्चच्या समोर आले असता समोरून आलेला ट्रक क्रमांक जी जे 32 व्ही 2023 हा विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आला आणि त्यांच्या इनोवा कारला जोरात ठोकर मारून अपघात केला. या अपघातामध्ये कारची एअर बॅग निघाल्याने ओमकार घरत त्याला किरकोळ दुखापती झाल्या. त्यांच्यासोबत असलेले शुभम सुरेश घरत हा गंभीर जखमी झाला. शुभम घरत यांना गांधी हॉस्पिटल पनवेल येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर बेलापूर येथे नेण्यात आले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.
ट्रकची कारला धडक लागून दोघेजण जखमी
