पनवेल | वार्ताहर |
कळंबोली-मुंब्रा रोडवर खिडुकपाडा गाव येथे एका ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत आठ वर्षाची मुलगी आणि चाळीस वर्षाच्या इसमाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण भगवान गायकवाड हे रिया जाधव हिला भिवंडी येथे तिच्या घरी सोडण्यासाठी मोटरसायकल क्रमांक एम एच 46 बिच 1693 वरून निघाले होते. कळंबोली मुंब्रा रोडवर खीडुकपाडा गाव समोर त्यांची मोटारसायकल आली असता मोटार सायकलला पिबी 13 एडब्ल्यू 2542 या ट्रकने धडक दिली. यात दोघेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. ट्रक चालकाविरुद्ध कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.