| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल परिसरातून गेल्या 24 तासात दोन मोटारसायकलची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शहरातील एसटी बस स्टँडसमोर असलेल्या कोकण हॉटेल येथे भारत राठोड हे त्यांची मोटारसायकल त्या ठिकाणी ठेवून जेवणासाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी 60 हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटारसायकल क्र.एमएच-21-बीएक्स-6818 ही चोरुन नेली आहे. तर, दुसर्या घटनेत उमेश गायकर यांनी त्यांची बुलेट मोटारसायकल पळस्पे फाटा येथे जेएनपीटी ते पळस्पे जाणार्या उड्डाण पुलाखाली उभी ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर गाडी चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







