। पनवेल । प्रतिनिधी ।
गॅस बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी कामोठे येथे राहणाऱ्या दोघांना तब्बल 4 लाख 46 हजारांना लुबाडल्याचे उघडकीस आले आहे. या दोन्ही घटना कामोठे परिसरात घडल्या आहेत. पहिल्या घटनेत सायबर चोरट्याने एक लिंक पाठवून कामोठे सेक्टर- 18 मधील श्री गणेश सोसायटीत राहणारे आशुतोष पाटील यांच्या खात्यातून 2 लाख 2 हजार रुपये काढून घेतेले. तर ओमशिवम रेसिडेन्सीमध्ये राहणारे पवन सिंग यांनासुद्धा हीच लिक पाठवून त्यांच्या खात्यांतून गुगल पे व फोन पेद्वारे एकूण 2 लाख 44 हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली.






