भीषण अपघात दोघे ठार

| माणगाव | प्रतिनिधी |
माणगावपासून चार कि.मी. अंतरावर असणार्‍या तिलोरे गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने येणार्‍या कंटेनरची मोटारसायकलला धडक लागून झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यू होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. हा अपघात रविवार, दि.15 जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद राजेंद्र गंगाराम राइका (29) रा. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, या अपघातातील फिर्यादी राजेंद्र गंगाराम राइका हे त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर क्र.एम एच 06 बीइ 7177 ही गाडी स्वतः चालवीत घेऊन माणगाव बाजूकडून जात असताना माणगाव बाजुकडून येणारा कंटेनर क्र.एम एच 46/ बीएम 0676 वरील अज्ञात चालक याने त्याच्या ताब्यातील कंटेनर हा रसत्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवीत घेऊन येत असताना फिर्यादी यांच्या समोरून माणगाव बाजुकडे चालणारी मोटारसायकल क्र.एम एच 02/ इजी 1385 या गाडीला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील विशाल संजय सकपाळ (34) रा. दिवा, जिल्हा ठाणे व राजेश राजाराम धामणकर (30) रा. खार ईस्ट मुंबई या दोघांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळताच अतिरिक्त माणगावचा कार्यभार असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी रोहा किरण कुमार सुर्यवंशी व माणगाव पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी अपघात ठिकाणी भेट दिली. या अपघाताचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. लहांगे हे करीत आहेत.

Exit mobile version