जप्त केलेल्या दोन बोटींचा लिलाव करणार

| पनवेल | वार्ताहर |
एनआरआय पोलीस स्टेशन हद्दीत 13 फेब्रुवारी 2022 रोजी दोन बोटी जप्त करण्यात आल्या असून, या बोटींचे लिलाव करण्याबाबत नियंत्रक शिधावाटप, अधिकारी मुंबई यांचे आदेश झाले आहेत.

गुन्ह्यातील जप्त बोटी या उलवे जेटी बेलापूर येथे ठेवण्यात आलेल्या आहेत. नमूद बोटी या लिलाव पद्धतीने विक्री करावयाचे असल्याने इच्छुकांनी नमूद बोटी उलवे जेटी बेलापूर नवी मुंबई येथे बघून दि. 12 ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्त यांचे कार्यालय बेलापूर नवी मुंबई येथे सकाळी 11 वाजता लीलाव होणार असून, इच्छुक लोकांनी सदर ठिकाणी न चुकता हजर राहावे, असे आवाहन मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा, नवी मुंबई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह भोसले यांनी केले आहे.

Exit mobile version