दोन जवान शहीद

| गडचिरोली | वृत्तसंस्था |

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील सिल्गर आणि टेकुलगुडमदरम्यान माओवाद्यांनी मोठा आयईडी स्फोट केला. या स्फोटात दोन जवान शहीद असून, अनेक जवान जखमी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विष्णू आर आणि शैलेंद्र अशी शहीद जवानांची नावे आहेत. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. 201 कोब्रा वाहिनीची अ‍ॅडव्हान्स पार्टी जागरगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅम्प सिल्गर येथून आरओपी ड्युटीदरम्यान ट्रक आणि मोटारसायकलने कॅम्प टेकलगुडेमकडे जात होती. दरम्यान, नक्षलवाद्यांनी सिल्गर ते टेकलगुडेम या मार्गावर दुपारी 3 वाजताच्या सुमारास एक ट्रकवर आयईडी स्पोट घडवून आणला. यामध्ये चालक आणि सहचालक जागीच शहीद झाले.

Exit mobile version