दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या; सुदैवाने प्रवासी बचावले

ओव्हर टेक करताना अपघात झाल्याची माहिती समोर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबागहून जळगावकडे जाणारी आणि पनवेलहून अलिबागकडे येणारी अशा दोन बस समोरासमोर धडकल्या. बसचे नुकसान झाले आहे. काही किरकोळ जखमी वगळता सुदैवाने बसमधील प्रवासी बचावले. ओव्हर टेक करताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना मंगळवारी (दि. 21) सकाळी कार्लेखिंड येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग आगारातून सकाळी जळगावकडे बस निघाली. प्रवाशांना घेऊन पेणमार्गे बस जात होती. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कार्लेखिंड येथे आल्यावर चालकाने एका दुचाकीला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पनवेलहून अलिबागकडे जाणारी बस समोरून आली. या दोन्ही बसचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, दोन्ही बसचे नुकसान झाले. या बसमधील 34 प्रवासी सुखरूप असल्याची माहिती एसटी बस आगारातून देण्यात आली आहे.

Exit mobile version