नाना पाटील हायस्कूलचे दोन छात्र नवी दिल्लीतील परेडमध्ये

| वाघ्रण | वार्ताहर |

प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) दिल्लीत राजपथावर होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात को.ए.सो. नाना पाटील हायस्कूल मधील सार्ज. जय महेश पाटील व कॅडेट गौरव दत्तेश डिंगणकर या दोन कॅडेट ची निवड झालेली आहे.

या कॅडेटने एक भारत श्रेष्ठ भारत (औरंगाबाद )येथे झालेल्या देशपातळीवरील कॅम्प मध्ये कल्चरल अ‍ॅॅक्टिव्हिटीमध्ये सुवर्णपदक मिळविलेले होते. त्यानंतर त्यांना पुणे येथे होणार्‍या आरडीसी कॅम्प सिलेक्शनसाठी बोलविण्यात आले. त्यामध्ये सर्व महाराष्ट्रातून एकूण 116 कॅडेटची निवड केली त्यामध्ये ज्युनिअर डिव्हीजनच्या 35 कॅडेटची निवड झाली, त्यामध्ये रायगड मधील या दोन कॅडेटचा समावेश झाला आहे. या छात्रांना शाळेचे एनसीसी अधिकारी समाधान भंडारे यांनी मार्गदर्शन करून सर्व तयारी करून घेतली. तसेच सिक्स महाराष्ट्र बटालियनचे सीओ कर्नल मनिष अवस्थी सर्व पीआय स्टाफ यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी प्रचंड मेहनत करतात. एनसीसी च्या विविध चाचण्यांतून विद्यार्थ्यांची आरडीसाठी निवड केली जाते. 1 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची दिल्लीत राहण्याची व्यवस्था केली जात असते. या कालावधीत या विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला जातो. या दरम्यानचा संपूर्ण खर्च केंद्र सरकारतर्फे केला जातो.

या निवडीबद्दल शाळा समितीचे सभापती पंडित पाटील यांनी कॅडेट व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक के.के.फडतरे, सत्रप्रमुख शशी पाटील, पिळवणकर मॅडम, खरसंबळे मॅडमतसेच सर्व शिक्षकवृंद यांनी कौतुक केले.

Exit mobile version