महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले

| पनवेल | प्रतिनिधी |

पायी जात असलेल्या 29 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरील दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना पनवेल शहरातील टिळक रोड परिसरात घडली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्षितीजा निकम असे 29 वर्षीय महिलेचे नाव असून, त्या आपल्या आईसोबत घरी पायी जात होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना अडवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि मंगळसूत्र जबरीने खेचले. या झटापटीत त्यांच्या गळ्याला दुखापत झाली. त्यानंतर दोन्ही चोरटे मोटारसायकलवरून पसार झाले. या चोरट्यांनी सुमारे 3 लाख रुपये किमतीचे साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण आणि 1 लाख रुपये किमतीचे एक तोळ्याचे मंगळसूत्र असा एकूण 4 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम पनवेल शहर पोलिसांकडून सुरू आहे.

Exit mobile version