गुहागर येथील दोन पर्यटकांना अलिबाग बीचवर जीवदान

जिवरक्षकानी वाचवले प्राण
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
गुहागर येथील अलिबाग समुद्र किनारी कुलाबा किल्ला पाहून भरतीच्या पाण्यातून परतत असताना बुडत असताना बीचवरील जीव रक्षकांनी प्राणाची बाजी लावत त्यांचे प्राण वाचवले. अलिबाग बीच वर आज 5 वाजता गुहागर येथून आलेले पर्यटक कु. हरीओम कुमार, कु. साहेद कुमार हे दोघे आले होते. ते आज कुलाबा किल्ला पाहण्यासाठी पाण्यातून गेले होते. मात्र परत येत असताना समुद्राच्या पाण्याला भरती आल्याने पाणी वाढले होते. मात्र परत येण्यासाठी ते दोघे पाण्यातून पोहत येवू लागले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. बीच वर असलेल्या जीवरक्षक बंडया सारंग व दिपक ढोले, व कुणाल सारंग यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी समुद्रात उड्या मारत त्या दोघांना वाचवले.

Exit mobile version