दोन अनोळखी महिलांनी सोन्याची बाळी लांबवली

। पनवेल । वार्ताहर ।

दोन अनोळखी महिलांनी एका सोन्याच्या दुकानात जाऊन गर्दीचा फायदा घेऊन कानातील एक जोडी सोन्याची बाळी लांबवल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.

प्रकाश चौधरी यांच्या न्यू गोल्ड पॅलेस या सोन्याच्या दुकानात दोन अनोळखी महिला आल्या व त्यांनी सोन्यातील कानाची बाळी खरेदीच्या बहाण्याने एक सोन्याची बाळी स्वतःच्या ताब्यात ठेवून दुकानातील गर्दीचा फायदा घेऊन 30 हजार रुपये किमतीची एक बाळी घेऊन त्या पसार झाल्या आहेत. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

Exit mobile version