| माणगाव | वार्ताहर |
मुंबई- गोवा महामार्गावर अपघाताचे मालिका सत्र सुरूच आहे. मुंबई -गोवा महामार्गावर इंदापूर येथील विभाजकाजवळ आयशर टेम्पो व छोटा टेम्पो यांच्यात समोरासमोर झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.11) रोजी सकाळी 5.30 वा. च्या सुमारास नरेंद्रसिंग रजपूत, (30) यांने त्यांचे ताब्यातील आयशर टेम्पो हा गोवा बाजूकडून मुंबई बाजुकडे विरुद्ध दिशेने चालवत जात असताना इंदापूर येथील महामार्गावर छोटा टेम्पोला समोरुन धडक देऊन अपघात केला. या अपघातात 8 जण जखमी झाले असून, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. फडताडे करीत आहेत.