। रोहा । वार्ताहर ।
अष्टमी कुंडलिका नदीच्या पुलावर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार, त्याची पत्नी जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.18) रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. रोहा शहराकडून अष्टमी बाजूकडे कुंडलिका नदीचे नवीन पुलावर भरधाव वेगाने विरूद्ध दिशेने येणाऱ्या चालकाने समोरून येणारे साहिल पाटील, साक्षी पाटील दोघेही रा. दमखाडी ता. रोहा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात साक्षी पाटील, साहिल पाटील हे दोघेही जखमी झाले आहेत. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मपोहवा साळुंखे अधिक तपास करित आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अष्टमी पुलावर अपघातांची मालिका सुरुच असून, आठवड्याभरापूर्वी दोन दुचाकींच्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून, एक व्यक्ती मृत्यूशी झुंज देत आहे.
अष्टमी पुलावर दुचाकींचा अपघात; दोघेजण जखमी
