माणगाव-मोर्बा रस्त्यावर दुचाकीला अपघात

अल्पवयीन बालके जखमी
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव-मोर्बा रस्त्यावर राईस मिलच्या पुढे अचानक गाय आडवी आल्याने दुचाकीला अपघात होऊन या अपघातात दुचाकीवरील दोन अल्पवयीन बालके जखमी झाली. या अपघाताची फिर्याद कुंजन पाटील रा.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. सदर अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, अपघातातील एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा रा.माणगाव हा माणगाव मोर्बा रस्त्यावर होंडा हॉरनेट मोटार सायकल क्र.एम.एच 06 बीएस 2973 हि गाडी स्वतः चालवीत घेऊन त्याचा अल्पवयीन मित्र (वय-13) रा.माणगाव यास सदर मोटार सायकलवर मागे बसून माणगाव ते निलगुन फाटा असा माणगाव -मोर्बा रस्त्याने राउंड मारण्याकरिता घेऊन जात असताना राईस मिलच्या पुढे रस्त्यावर अचानक एक गाय आडवी आल्याने मोटार सायकलची गाईला समोरून धडक लागून अपघात झाला. या अपघातात दोन्ही अल्पवयीन मुले जखमी झाली. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.239/2021 भादवि संहिता कलम 279, 337 मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक धनावडे या करीत आहेत.

Exit mobile version