पेण-अलिबाग मार्गावर दुचाकीचा अपघात; चालक जखमी

| अलिबाग | प्रतिनिधी |

पेण-अलिबाग मार्गावरील खंडाळेजवळ कार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकी चालक जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.13) सायंकाळी घडली.

अलिबागहून पेणकडे सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पर्यटक कार घेऊन जात होता. दरम्यान, समोरून येणारी दुचाकी आणि कारची समोरासमोर ठोकर झाली. त्यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघातात दुचाकीचालक जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

Exit mobile version