। पनवेल । प्रतिनिधी ।
पोलिसांच्या वाहनाला दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. या अपघाता प्रकरणी ईशान राजीव (20) राहणार सेक्टर 17, रोडपाली याच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार अजय मोरे हे दहशतवाद विरोधी पथक नवी मुंबई येथे कार्यरत आहेत. ते वाहन क्रमांक एम एच 01 ई एन 6442 हे लोटस हॉस्पिटल, रोडपाली येथील टी पॉइंट येथे वळण घेऊन पोलीस मुख्यालयाकडे जात होते. यावेळी ईशान याने मोटरसायकल ही फुडलँड सिग्नल कडून पुरुशार्थ ब्रिज कडे जाणाऱ्या रोडवर स्पीड ब्रेकरकडे दुर्लक्ष करून वेगाने चालवली. आणि सरकारी वाहनाला समोरील बाजूने ठोकर मारली. या अपघातात ईशान राजीव आणि त्याच्या पाठीमागे बसलेली श्रिया गोरे ही जखमी झाली. या अपघातात पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले.







