माथेरानमध्ये बंदी असतानाही दुचाकींची सैर; पोलिसांची कारवाई

। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान या पर्यटन स्थळावर येणारे पर्यटक यांच्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रेक्षणीय स्थळाचे रस्ते यांचे मजबुतीकरण केले जात आहेत. मात्र त्या रस्त्यांचा गैरवापर सर्रास होताना दिसत असून हौशी दुचाकीस्वार हे आपली वाहने सातत्याने नेत असून असा दुचाकीस्वार यांच्यावर प्रशासन कारवाई करणार आहे कि नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान, माथेरान नगरपरिषद आणि एमएमआरडीए यांच्याकडून रस्त्याचा वापर वाहने अनधिकृत पणे कोण करीत आहे याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.

माथेरान या वाहनांसाठी बंदी असलेल्या कर्जत तालुक्यात आणि मुंबई पासून सर्वात जवळ असलेल्या पर्यटन स्थळावर पर्यटकांसाठी चांगले रस्ते बनविले जात आहेत. त्यात माथेरानच्या दस्तुरी भागात पॅनोरमा पॉईंट हे प्रेक्षणीय समजले जाणारे स्थान आहे.त्या प्रेक्षणीय स्थळाकडे जाण्यासाठी असलेला रस्ता 2005 च्या अतिवृष्टीत वाहून गेला होता.त्यानंतर शासनाकडे मागणी केल्यानंतर पॅनोरमासह माथेरान मधील अन्य प्रेक्षणीय स्थळे यांचे सुशोभीकरण केले जात आहे.त्यातून माथेरान मधील पॅनोरमा पॉईंटच्या सुशोभीकरण करण्यात आले आहे.त्यात त्या ठिकाणी जाणारा रस्ता तयार केला असून त्या रस्त्यावर सुरुवातीच्या काळात अनेक चारचाकी वाहने यांची वर्दळ सुरु होती. त्यानंतर चारचाकी वाहनांबद्दल गोंगाट झाल्यानंतर चारचाकी वाहनांची वर्दळ थांबली आहे.

मात्र सध्या दुचाकी वाहने या पॉईंट वर दररोज ये जा करीत आहेत. त्या वाहनांना कधी आणि कोण अडवणार हे प्रशासनाने ठरवायला हवे.दस्तुरी ते पॅनोरमा पॉईंट या मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडे असून त्या झाडांवर पक्षी तसेच प्राणी यांना वाहनांच्या वर्दळी मुळे त्यांची पिळवणूक होत आहे.हे लक्षात घेऊन प्रामुख्याने पॅनोरमा पॉईंट कडे सुरु असलेली वाहने यांची वर्दळ थांबविण्याची गरज आहे.त्यास्तही माथेरान गिरिस्थान नगरपरिषद यांच्याकडून पॅनोरमा पॉईंट पर्यंत वहाणारे जाऊ नयेत यासाठी काही उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र त्या भागात ददरोज ये जा करीत असलेल्या वाहनांना कोण बंदी घालणार असा प्रश्‍न आहे.
माथेरान मध्ये वाहननबंदी आहे आणि त्यामुळे वाहणारे नेणारे वाहनचालक आणि त्यांच्या वाहनांवर वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करणायची गरज आहे. अशा कारवाई यापूर्वी माथेरान मध्ये वाहने घेऊन जाणारे यांच्यावर झालेली आहे. मग दररोज पॅनोरमा पॉईंट कडे जाणारी वाहने यांना रोखण्यात पोलीस आणि वन विभाग कचरत आहे हा देखील प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.त्यातून देशातील क्रमांक एक चे उद्योजक नीता अंबानी देखील सुटल्या नव्हत्या.मात्र माथेरान पोलिसांनी त्या वाहनांमुळे कायदा मोडण्याचे वाढलेलले प्रमाण लक्षात घेऊन एमएच 47 एआर 5031 तसेच एमएच 27-6031 या दोन्ही दुचाकींवर कारवाई केली आहे अशी माहिती प्रभारी पोलीस अधिकारी शेखर लव्हे यांनी दिली आहे.

सदर प्रेक्षणीय स्थळाचे सुशोभीकरण एमएमआरडीए कडून करण्यात आले आहे.त्यामुळे दस्तुरी वाहनतळ ते पॅनोरमा पॉईंट या दरम्यान वाहने जाणार नाहीत याची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांची आहे. मात्र त्या भागात वाहने जाऊ नयेत आणि परिसरातील शांतता भंग होऊ नये यासाठी काय नियोजन करता येईल याचा अभ्यास आम्ही करीत आहोत.

– सुरेखा भणगे- मुख्याधिकारी

आम्ही पॅनोरमा पॉईंट कडे जाणारा रस्ता नव्याने करून घेतला तसेच पॅनोरमा पॉईंट भागात सुशोभीकरण देखील पूर्ण केले. त्यानंतर त्या प्रेक्षणीय स्थळाचे काम आमच्या निविदेप्रमाणे पूर्ण झाल्याने आम्ही विकसित केलेला पॅनोरमा पॉईंट पालिकेकडे हस्तनतरीत केला आहे. आता पालिकेने त्या भागात वाहने जाणार नाहीत यांची काळजी घेतली पाहिजे आणि उपाययोजना केल्या पाहिजेत.

– अरविंद धाबे, कार्यकारी अभियंता,एमएमआरडीए
Exit mobile version