मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात 34 दुचाकी आगीच्या भक्षस्थानी

। पनवेल । प्रतिनिधी ।
हार्बर रेल्वे मार्गांवरील मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात गवताला आग लागून परिसरात उभ्या असलेल्या 42 पैकी 34 दुचाकी आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत. सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच कळंबोली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून ते आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आगीत किती दुचाकींचे नुकसान झाले याची माहिती अद्याप हाती लागली नसून, चार ते पाच दुचाकीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानक परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेचे काम सुरु असल्याने स्थानक परिसरातील वाहनतळ बंद असल्याने हार्बर मार्गांवरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना नाईलाजाने परिसरातील मोकळ्या मैदानाचा वापर वाहन उभी करण्यासाठी करावा लागतो. आगीची झळ पोहचलेल्या दुचाकी रेल्वे प्रवाशांच्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version