अग्निविरांना दोन वर्षांची मुदतवाढ

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

अग्निविरांना त्यांच्या सेवा कालावधीत दोन वर्षांची मुदतवाढ देण्याची घोषणा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल एन.एस. राजा सुब्रमणी यांनी केली आहे. या निर्णयानुसार, चार वर्षांचा प्रारंभिक सेवा काळ पूर्ण झाल्यानंतर नियमित सेवेसाठी निवड न झालेल्या 75 टक्के अग्निवीरांना आणखी दोन वर्षे सैन्यात सेवा बजावता येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अग्निवीरांचा एकूण सेवा कार्यकाळ आता सहा वर्षांचा होणार असून, त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन आणि निवड निकषांच्या आधारे त्यांना पुन्हा एकदा नियमित सशस्त्र दलात सामील होण्याची संधी मिळणार आहे.

Exit mobile version