माणगावात दोन वर्षीय बालकाचे अपहरण

आरोपीवर गुन्हा दाखल
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील बोर्ले गावातील दोन वर्ष तीन महिन्याच्या बालकाला त्याच्या अज्ञातपणाचा फायदा घेत आरोपीने त्यास पळविल्याने आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील आरोपी संतोष अशोक यादव (वय-30) रा.बोर्ले ता.माणगाव याने फिर्यादी सुनील बारीकराव यादव यांच्या घराच्या समोरील अंगणातून त्याच्या मालकीची होंडा शाईन मोटारसायकल क्र.एम. एच. 06 बी एक्स 8824 या गाडीवरून फेरफटका मारण्याच्या निमित्ताने रूद्र अरुण यादव (वय- 2 वर्षे 3 महिने) यास कोणत्यातरी अज्ञात कारणावरून त्याच्या कायदेशीर पालकांच्या संमतीशिवाय त्यांच्या रखवालीतून जबरदस्तीने घेऊन पळून गेला. या प्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.230/2021 भादवि संहिता कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एम.वराळे हे करीत आहेत.

Exit mobile version