। पुणे । प्रतिनिधी ।
हिंजवडी-माण रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नरवर भीषण अपघात झाला आहे. भरधाव रेडिमिक्स डंपर वळण घेताना पलटी झाला. या अपघातात दुचाकी डंपरखाली सापडल्याने दुचाकीवरील दोन तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. 24) सायं. पाचच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस, वाहतूक पोलीस व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. तीन क्रेनच्या साहाय्याने डम्पर बाजूला घेण्याचे काम सुरु आहे. मृत तरुणींची अद्याप ओळख पटली नसून पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.