महिलेच्या पाठपुराव्याला यश; माती चोरी प्रकरणी अखेर गुन्हा

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील चणेरा विभागात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या गौण खनिज चोरीबाबत अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीबाबत कृषीवल मधून सातत्याने आवाज उठविण्यात आला आहे.तळवडे येथील मनिषा बांदल या महिलेच्या शेतातील माती एका वीटभट्टी व्यावसायिकाने विना परवानगी उत्खनन करून नेली होती.याबाबत संबंधित महिलेने मागील 15 दिवस शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत माती चोरी करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले होते.

अखेर या माती चोरी करणार्‍यांच्या विरोधात भादवि कलम 379,427 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणार्‍यांना चाप बसेल असे बोलले जात आहे. या प्रकरणात मुजमिल गिते,मुदस्सर गिते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून माती उत्खनन करण्यासाठी वापरण्यात आलेला जेसीबी एमएच 15 सीयू 5613 वरील चालक तसेच डंपर क्रमांक एमएच 04 एफजे 3267 व एमएच 04 – 7167 वरील चालक या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणार्‍याना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version