मावळचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता
| खोपोली | प्रतिनिधी |
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा खोपोलीत सोमवारी (दि.4) सायंकाळी 5.30 वाजता संपन्न होणार आहे. मावळ मतदारसंघाचा अधिकृत उमेदवार जाहीर करतील अशी माहिती लोकसभा समन्वयक केसरीनाथ पाटील यांनी खोपोलीत दिली. त्यांनी महाराष्ट्रात दौरा सुरू केला असतानाच खोपोलीत जाहिर सभेचे आयोजन केले आहे. जाखोटीया यांच्या मैदानात सर्व शिवसैनिक मेहनत घेत साहेबांच्या सभेची तयारी करत असताना शुक्रवार (दि.1) मावळ लोकसभेचे समन्वयक केशरीनाथ पाटील यांनी भेट देत सभेच्या ठिकाणाचा आढावा घेतला, यावेळी त्यांनी सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सूचना दिल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, प्रभारी शहरप्रमुख संतोष देशमुख, प्रवक्ते विलास चालके, संघटक नितीन मोरे, विभागप्रमुख चिंतामण चव्हाण, उपशहर प्रमुख श्रीरंग चाळके, युवा नेता समाधान दिसले आदी प्रमुखासह शिवसैनिक-युवासैनिक उपस्थित होते.







