| मुंबई | वृत्तसंस्था |
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी उमदेवार यादी जाहीर केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महत्त्वाचं म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरेंनी उमेदवार मैदानात उतरवला आहे. सत्यजीत पाटील यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. याआधी ठाकरे गटाने 17 जणांची उमेदवार यादी जाहीर केली होती. आमच्याकडे उत्तर मुंबई साठी उमेदवार आहे, तरी देखील आम्ही उत्तर मुंबई साठी उमेदवार देण्यासाठी मित्र पक्षाला विचारतोय, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरेंची दुसरी उमेदवार यादी कल्याण लोकसभा - वैशाली दरेकर हातकणंगले - सत्यजीत पाटील पालघर - भारती कामडी जळगाव - करण पवार
ठाकरे गटाची पहिली यादी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 17 जणांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये अनंत गिते, अनिल देसाई, अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, राजन विचारे, अमोल किर्तीकर यांची नावं होती.
ठाकरे गटाची उमेदवार यादी बुलढाणा - नरेंद्र खेडेकर यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख मावळ - संजोग वाघेरे-पाटील सांगली -चंद्रहार पाटील हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे धाराशिव - ओमराजे निंबाळकर शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे नाशिक - राजाभाई वाजे रायगड - अनंत गीते सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत ठाणे - राजन विचारे मुंबई-ईशान्य - संजय दिना पाटील मुंबई-दक्षिण - अरविंद सावंत मुंबई-वायव्य - अमोल कीर्तिकर परभणी - संजय जाधव मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई कल्याण लोकसभा - वैशाली दरेकर हातकणंगले - सत्यजीत पाटील पालघर - भारती कामडी जळगाव - करण पवार