सगुणा रुरल फाऊंडेशनचा यशस्वी प्रयोग
| नेरळ | वार्ताहर |
शहरे आणि खेडेगावांना पिण्याच्या पाण्याचे महत्त्वाचे स्त्रोत असलेल्या उल्हास नदीचे गटारगंगेत रुपांतर झाले होते. मात्र, कृषीरत्न शेखर भडसावळे यांनी उल्हास नदीला जलपर्णीच्या विळख्यातून बाहेर काढले आहे. दरम्यान, रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यात उल्हास नदी बचावाची सुरू झालेली मोहीम आणि राज्य शासनाचे त्या चळवळीला मिळालेले पाठबळ यामुळे या नदीने आता मोकळा श्वास घेतला आहे.
कर्जत शहरात उल्हास नदी प्रदूषणसोबत नेरळपर्यंत येथील तरुणांनी सुरू केलेली मोहीम ठाणे जिल्ह्यात पोहोचली आहे. गेल्या काही वर्षात प्रदूषणामुळे गटारगंगा झालेल्या बालधुनी नदीच्या संवर्धनासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या मोहिमेत अंबरनाथमधील विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि सगुण रूरल फाऊंडेशनच्या मदतीने या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. जीआयपी धरणापासून स्वच्छता सुरू केल्यानंतर शिवमंदिराजवळ बंधारा बांधून त्यात जीवाणूंच्या मदतीने पाणी शुद्ध करण्याचा उपक्रमही यावेळी सुरू करण्यात आला. बदलापूर शहरातून उल्हासनगर आणि पुढे वाहणार्या आपल्या उल्हास नदीवरील जलपर्णीला हटवण्यात यश आले आहे.
अंबरनाथ तालुक्यातील प्रदूषित वालधुनी नदीच्या संवर्धनाचा प्रकल्प अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून या नदीच्या संवर्धनाची मागणी केली जात होती. अखेर अंबरनाथ नगरपालिकेचे ही मोहीम हाती घेण्यात आली असून, येत्या जागतिक पर्यावरण दिनापर्यंत ही मोहीम चालवली जाणार आहे. वालधुनी नदीला सहा वेगवेगळ्या भागात विभागून नदीतील स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली आहे.
नदीचे प्रवाह सुरळीत
उल्हास नदीची उपनदी असलेल्या वालधुनी नदीचे संवर्धन केले जात आहे. उल्हास नदीवर प्रभावी ठरलेल्या सगुण जलसंवर्धन तंत्राची माहिती सगुणा रूरल फाऊंडेशनचे प्रमुख चंद्रशेखर भडसावळे यांनी दिली आणि अंबरनाथ शहरातील पी.डी. कारखानीस महाविद्यालय, भगिनी मंडळ शाळेचे विद्यार्थी, पालिकेचे सफाई कर्मचारी युवा युनिटी फाऊंडेशन, वालधुनी जल बिरादरी, आरोग्य अधिकारी सुरेश पाटील आणि पर्यावरणप्रेमी प्रदूषण झालेल्या नदीत उतरले.
सगुणा तंत्राचा वापर
जीवाणूंना मदत व्हावी यासाठी वालधुनी नदीवर शिवमंदिराजवळ यावेळी एक मातीचा बंधारा बांधण्यात आला. या बंधार्याजवळ साचणार्या पाण्यात प्राणवायूवर जगणारे जीवाणू सोडले जाणार आहे. त्यांच्या मदतीने पाणी शुद्ध होण्यास मदत होत असते. ही सगुणा जलसंवर्धन तंत्राच्या माध्यमातून उल्हास नदी थेट कर्जतपासून कल्याणच्या खाडीपर्यंत टिटवाळापर्यंत जलपर्णीमुक्त झाली आहे. तेच तंत्र वालाधुनी नदीचे संवर्धन करण्यासाठी राबविले जात आहे.