उलवे गाव झाले प्रकाशमय

शेकापचे युवा नेते येरूणकर यांचे प्रयत्न

। उरण । वार्ताहर ।

सेक्टर 8 बी उलवे नोड येथे गेली 7 वर्ष रस्त्यावर दिवे नव्हते. आणि सेक्टर 8 बी हा भाग खूप आतमध्ये असल्यामुळे तिकडे रस्त्यावर अंधार होता आणि नको ते प्रकार घडत होते. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. या सदर घटनेची व गंभीर समस्येची कल्पना सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल जाधव यांनी शेतकरी कामगार पक्षाचे युवानेते सचिन राजे येरुणकर यांना दिली. सचिन राजे येरुणकर यांनी लोकशाही मार्गाने कायदेशीररित्या शासनाकडे पाठपुरावा करून फक्त 2 आठवड्यामध्ये उलवे 8 बी रस्त्यावर व परिसरात लाईटस लावून दिल्या. नेहमी अंधारात असलेला परिसर सचिन राजे येरुणकर यांच्या प्रयत्नामुळे उजेडात आला. त्या परिसरात अंधाराऐवजी आता लख्ख प्रकाश पडला आहे.

आता नागरिकांना प्रवास करणे सुरक्षित व सोपे झाले आहे. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून सचिन राजे येरुणकर यांनी केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सेक्टर 8 मधील रहिवाशी यांनी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते सचिन राजे येरुणकर यांचे प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले. यावेळी सचिन घरत, सुहास देशमुख, राजेंद्र घरत, राकेश घरत, रोशन म्हात्रे, हेमंत पाटील, रमेश ठाकूर, अण्णा घरत, मिलिंद ढोके, चंद्रकांत बाकळकर, विठ्ठल जाधव आदी उपस्थित होते.

Exit mobile version