| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील गोवे गावातील रहिवाशी उमाजी भिवा पवार यांचे सोमवारी (दि.11) अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय 84 वर्षाचे होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे नातेवाईक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्षेत्रातील असंख्य नागरिक व समस्थ गोवे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन सुना, पुतणे, नातवंडे, पतवंडे व मोठा पवार परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी बुधवारी (दि.20) व उत्तरकार्य विधी शुक्रवारी (दि.22) त्याच्या निवास्थानी होणार आहेत.






