| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि.7) समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्त शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने, तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रतीक खारकर यांच्या सहकार्याने अलिबाग तालुक्यातील बामणगाव आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना छत्री वाटप करण्यात आले.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गरजू नागरिकांना उपयुक्त ठरेल, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. छत्री वाटपामुळे आदिवासी बांधवांनी आनंद व्यक्त करत आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. समाजातील वंचित आणि गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणारे असे उपक्रम सातत्याने राबविण्यात यावेत, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करत त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे कौतुक केले.
जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटप
