उमेश पवार यांना मातृशोक

पेण | वार्ताहर |
बुरूड समाजाचे तालुका अध्यक्ष तथा शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते उमेश पवार यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई हरी पवार यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. लक्ष्मीबाई यांच्या पार्थिवावर गागोदे बुद्रुक येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सामाजिक, शैक्षणिक, व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version