खारघरमध्ये अनधिकृत झोपड्या

हॉटेलबाहेरील अतिक्रमित जागांवर तोडक कारवाई

| पनवेल | वार्ताहर |

आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार प्रभाग समिती अ खारघर सेक्टर क्रमांक 14 मधील घरकुल रोडवरील अनधिकृत झोपड्यांवर प्रभाग समिती अ च्या अतिक्रमण विभागाच्यावतीने तोडक कारवाई करण्यात आली. तसेच खारघरमधील हॉटेल ब्युटीफुल व हॉटेल अचिजा यांनी हॉटेलबाहेर अनधिकृतरित्या आक्रमण केलेल्या जागांवर तोडक कारवाई करण्यात आली.

उपायुक्त बाबासाहेब राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई करण्यात आली. खारघर सेक्टर क्रमांक 14 मधील घरकुल रोडवरील सुमारे 14 झोपड्यांवर जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई करण्यात आली. तसेच खारघर प्रभागामधील हिरानंदनी रोडवरील हॉटेल ब्युटीफुल व हॉटेल अचिजा यांच्या हॉटेलबाहेरील अनधिकृतरित्या आक्रमण केलेल्या जागांवर खारघर प्रभाग समिती अ च्या अतिक्रमण पथकाने जेसीबीच्या साहाय्याने तोडक कारवाई केली.

Exit mobile version