खालापूरातील धामणी हद्दीत आढळला बेवारस मृतदेह

मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा तपास सुरु
। वावोशी । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील धामणी या ठिकाणी दिनांक २५ मे २०२२ रोजी बेवारस तरुणाचे प्रेत आढळून आले होते. अद्याप या मयत तरुणाची किंवा त्याच्या वारस, नातेवाईकांची ओळख झालेली नाही तरी सदरील मयत तरुणाच्या वारस किंवा नातेवाईकांची ओळख व्हावी याकरिता खालापूर पोलीस ठाण्याकडून शोधपात्रिका जारी करण्यात आली आहे.

सदरील बेवारस मयत तरुणाचे प्रेत खालापूर तालुक्यातील धामणी गावातील ग्रामस्थ सुभाष खंडू लोते यांच्या जागेत दिनांक २५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता आढळून आले होते. या बेवारस मयत तरुणाचे वय ३५ ते ४० वर्षांचे असून उंची १६५ सेमी. रंग गहू वर्णीय, केस वाढलेले, कमरेपासून वरचे अंग उघडे, कमरेपासून खाली निळ्या रंगाची मळकट जीन्स पँट, डोळे – घारे, काळे असे वर्णन असलेल्या या बेवारस मयत तरुणाचे वारस किंवा नातेवाईकांची ओळख व्हावी याकरिता खालापूर पोलीस ठाण्याकडून शोधपत्रिका जारी करण्यात आली असून सदरील मयत तरुणाची ओळख पटल्यास संबंधितांनी खालापूर पोलिस ठाण्यास त्वरित कळवावे असे आवाहन खालापूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version