| पाली/बेणसे | वार्ताहर |
सुधागड तालुक्यात नवघर ग्रामपंचायत हद्दीतील उंबरवाडी गावाच्या बाजूला असलेल्या डोंगरातील जंगल भागात भुत्याची मळशी येथे एका अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आल्याने तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. सदरील महिलेचे प्रेत हे बेवारस कुजलेल्या व सडलेल्या स्थितीत कोणत्यातरी अज्ञात कारणाने मयत झालेले मिळून आले. महिलेचे प्रेत व जंगलभागात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर महिलेची ओळख अद्याप पटली नाही. या घटनेची पाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी डॉगस्कोड आणि फॉरेन्सिक लॅबच्या टीमने प्रत्यक्ष येऊन घटनेची शहानिशा केली. या घटनेचा पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलीस करीत आहेत.