19 वर्षांखालील मुलींची क्रिकेट निवड चाचणी लोधिवलीत

| रायगड | वार्ताहर |

जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे रायगड जिल्ह्याचा 19 वर्षाखालील मुलींचा संघ निवडण्यासाठी (दि.4) मे रोजी निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. रिलायन्स कॉलनी लोधिवली येथे ही निवड चाचणी होणार आहे. 1 सप्टेंबर 2005 नंतर जन्मलेल्या रायगड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मुली या निवड चाचणीत सहाभगी होऊ शकतात. खेळाडूंनी शनिवार (दि.4) मे रोजी सकाळी 8.30 वाजता क्रिकेटच्या पांढर्‍या गणवेशात लोधीवली येथील मैदानावर हजर राहावे. अधिक माहितीसाठी चंद्रकांत मते 9822836442, प्रशांत ओक 9822422676 यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version