19 वर्षाखालील मुलींचे सराव शिबिर

संघ निवड चाचणीचे खारघर येथे आयोजन

। रायगड । खास प्रतिनिधी ।

जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित 19 वर्षांखालील मुलींचे सराव शिबिर व संघ निवड चाचणी 19 व 20 ऑक्टॉबर 2024 (शनिवार व रविवार) रोजी खारघर येथील इनामपुरीच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे.

1 सप्टेंबर 2006 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी (एकोणीस वर्षाखालील) हे शिबीर असणार आहे. सदर शिबिरासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व मुलींनी क्रिकेटच्या पांढर्‍या गणवेशात व आवश्यक क्रिकेट साहीत्यासह सकाळी 9:30 वाजता खारघर येथील इनामपुरी मैदानावर हजर राहायचे आहे.सर्व खेळाडुंनी सोबत आधार कार्ड (ओरिजीनल आणि फोटोकॉपी) व स्वतःचा एक पीपी साईज फोटो आणावा. सदर क्रिकेट शिबिरासाठी सहभागी होण्याकरिता कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. दोन दिवसीय शिबिरातून रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन 19 वर्षाखालील मुलींचा संघ निवडला जाणार आहे. जो ऑक्टोबर महिन्यात एमसीएतर्फे आयोजित केलेल्या अंतरजिल्हा निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Exit mobile version