। महाड । प्रतिनिधी ।
महाड येथे शिव स्पोर्ट्सतर्फे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 24 संघांनी प्रवेश घेतला होता. या स्पर्धेचे उदघाटन नगरसेवक दीपक सावंत यांनी केले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रावढळ संघास 20 हजार रूपये, द्वितीय जे.बी.आर.एस.काकरतळे संघास 10 हजार रूपये, तृतीय प्रीतम उमासरे मित्र मंडळ सरेकर आळी संघास 5 हजार रूपये तर चतुर्थ क्रमांक अधिरा चांभारखिंड संघास दोन हजार रूपये, तसेच इतर वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज विराज, उत्कृष्ट फलंदाज सूरज सावंत, मालिकावीर अरबाज करविणकर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी गोलंदाज व फलंदाज यांना चॅम्पियन्स स्पोर्ट्सकडून टीशर्ट व बॅट देण्यात आली तसेच मालिकावीराला सॅमसंग मोबाईल सचिन राऊत व रितेश घरटकर यांनी दिला. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभला दिपक सावंत, अभिजित सुतार, जुबेर सय्यद, भूषण शेलार, पत्रकार रवी शिंदे हे मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राहुल सावंत, विशाल सावंत, स्वप्निल करकरे, सुरज सावंत, सत्यजित घरटकर, सुरज करकरे, रोहित सावंत, निनाद शिंदे, रोहित जाधव, अक्षय मेंढे यांनी मोलाचे सहकार्य केले.







