| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहर शिवसेना आणि युवासेना यांच्या माध्यमातून आणि कर्जत नगरपरिषद गटनेते ॲड. संकेत भासे यांच्या संकल्पनेतून कर्जत शहर मर्यादित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जत प्रीमियर लीगचे यावर्षी तिसरे वर्षे असून दि.1 ते 3 मे या कालावधीत प्रीमियर लीग कर्जत शहरातील पोलीस मैदान येथे होणार आहे. कर्जत शहरातील खेळाडूंचे 40 संघ या प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाले असून खेळाडूंचा लिलाव आणि चषकाचे अनावरण पूर्ण झाले आहे. स्पर्धेत सहभागी संघांच्या संघमालकांनी आपले संघ निवडले असून त्या 40 संघाची 8 गटांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. या कर्जत प्रीमियर लीगमध्ये ग्रेव्ही इंटरप्राइजेस, जय अंबे भैरवनाथ,जॉय सेव्हन स्टार, आमराई रॉयल्स, अबिद सेव्हन स्टार, वरदविनायक मुद्रा, भीम गर्जना, रेबेल 4040, डीसीसी, शंकर इंटरप्राइजेस, अद्वित सेव्हन स्टार, काव्या निर्वेश सेव्हन स्टार, निखिल सेव्हन स्टार, आमराई वॉरियर्स, चार्मय सेव्हन स्टार, मैन्यू रायझिंग स्टार, केदारी इंटरप्रायजेस, झुनेरा अनम, डीसीसी पाटील आळी, पाल फाऊंडेशन, ध्रुवी अस्मि इंटरप्राइजेस, कुलदीपक दहिवली, राजवीर वॉरियर्स, यशस्वी इलेव्हन, डेक्कन जिमखाना, अनन्या सेव्हन स्टार, आयुष इलेव्हन, वन लाईफ गुंडगे, व्हिएस सेव्हन स्टार, ब्रदर ग्रुप, व्हिएच ग्रुप, टीम युवा, औरा फार्म, जय सेवालाल, मुद्रा टायगर, हारे का सहारा, अद्विक कन्स्ट्रक्शन, रोहित रॉयल्स, आई एकविरा असे संघ सहभागी होणार आहेत.







