टँकरखाली येऊन दुर्दैवी मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

टँकरने मोटारसायकलला कट मारल्यामुळे महिला खाली पडली व तिच्या डोक्यावरून टँकरच्या पाठीमागील चाक गेल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना करंजाडे, सेक्टर 2 येथे घडली. या प्रकरणी टँकरचालकाविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हुसेफा ताहेरअली आरिफ (रा. सेक्टर चार, करंजाडे) हे मोटारसायकलने पत्नी खतीजा आरिफ व मुलगी जहारा आरिफ हे राहत्या घरातून सेक्टर 2, करंजाडे येथील मुलीच्या मैत्रिणीकडे वाढदिवसासाठी जात होते. रात्री साडेआठच्या सुमारास शीतलादेवी मंदिरजवळ सेक्टर दोन ए, करंजाडे येथे आले असता टँकर चालकाने टँकर भरधाव चालवून मोटारसायकलला कट मारल्यामुळे पत्नी मोटारसायकलवरून खाली पडली. तिच्या डोक्यावरून पाठीमागील चाक गेल्याने तिचा मृत्यू झाला.

Exit mobile version