पाण्यात बुडून दोन वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

इमारतीच्या बांधकाम ठिकाणी असलेल्या पाणी भरलेल्या पाच-सहा फूट खोल खड्ड्यात पडून दोन वर्षीय मुलगी बुडाल्याने त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना करंजाडे येथे घडली आहे.

पुष्पक नगर, करंजाडे येथे मोलमजुरी करणार्‍या कुटुंबियांसोबत रिया राजकुमार मुर्मू (2) ही राहात होती. ती आपल्या भावासोबत त्या ठिकाणी खेळत होती. दरम्यान, नकळतपणे लिफ्टच्या खड्ड्यावर लावलेल्या लाकडी फळ्या व फ्लायवूड यांच्या मध्ये असलेल्या पाच-सहा फूट खोल खड्ड्यात पडून ती बुडाल्याने त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version