पनवेलमध्ये अनोळखी वृद्धाचा मृत्यू

ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृताची ओळख पटविण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी पुरुषास उपचारासाठी पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर घोषित केले. यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 70 वर्षे असून, तो पनवेल परिसरातील भागात आढळून आला होता. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणाचा तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील सरगर करीत आहेत. मृत व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version