| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
सदर व्यक्तीचा मृतदेह सीसीआय लॉजिस्टीक कंपनी पळस्पेच्या मागील बाजूस असलेल्या कंपाऊंडमध्ये आढळून आला असून, मृत व्यक्तीचे वय अंदाजे 60 वर्षे असून उंची सुमारे 5 फूट 7 इंच आहे. त्याचा रंग गोरा, चेहरा उभट, नाक सरळ असून केस काळे व पांढरे मिश्रित आहेत. उजव्या हाताच्या दंडावर इंग्रजी अक्षरातील टॅटू कोरलेला आहे. तसेच डाव्या हाताच्या मनगटावर हृदयाच्या आकाराचा टॅटू असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत तपास अधिकारी सपोनि प्रज्ञा मुंडे मो.नं.7666114874 येथे संपर्क साधावा.
पनवेलमध्ये अनोळखी इसमाचा मृत्यू
