अज्ञाताने एसटी बसच्या चाकीखाली दिला जीव

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

। पनवेल । प्रतिनिधी ।

अज्ञात कारणावरुन अज्ञात इसमाने एसटी स्टँण्डजवळील ओरियन मॉल समोरील पळस्पेकडे जाणाऱ्या लेनवर समोरुन जाणाऱ्या एसटी बसच्या मागील चाकाखाली उडी मारली. यात गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी रवाना झाले. या इसमाच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. या संदर्भात कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version