केंदीय कृषीमंत्र्यांचा कृषी कायद्याबद्दल यु-टर्न

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशाच्या शेती क्षेत्रात महत्त्वाकांक्षी सुधारणा घडवून छोट्या शेतकर्‍यांच्या आर्थिक प्रगतीचा दावा करणारे तीनही वादग्रस्त कृषी कायदे केंद्र सरकारने गेल्या महिन्यात रद्द केले. यानंतर संसदेतही विधेयक मंजूर करण्यात आलं. यासोबत दिल्लीच्या वेशींवर वर्षभर ठिय्या देणार्‍या शेतकरी पुन्हा आपल्या घरी परतले. त्यानंतर शनिवारी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना हे कृषी कायदे परत आणले जाऊ शकतात, असे वक्तव्य केले होेते. कृषी कायदे परत आणण्याचं वक्तव्य केल्यानंतर विरोधी पक्षांकडून केंद्रीय कृषीमंत्र्यांवर चांगलीच टीका झाली होती. पुढच्या वर्षी पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर केंद्र सरकार रद्द केलेले वादग्रस्त कायदे परत आणणार असल्याचा आरोप काँग्रेसने केला. याच दरम्यान तोमर यांनी आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देत केंद्र सुधारित स्वरूपात कृषी कायदे पुन्हा सादर करणार नाही, असे म्हटले.

Exit mobile version