मोठी बातमी! केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा

विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे सरकार झुकले

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

नीट पेपरफुटीप्रकरणी गेल्या वीस दिवसांपासून नवी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे अखेर केंद्र सरकार झुकले. विद्यार्थी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम होते. जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यत विद्यार्थी मागे हटणार नाहीत, अशी परखड भूमिका घेतल्याने देशभरातून केंद्र सरकारवर दबाव वाढत होता. त्यामुळे अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यानी आपला राजीनामा पंतप्रधान यांच्याकडे सुपूर्द केला. हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे बोलले जात आहे. मोदी सरकारमधील एखाद्या मंत्र्यावर राजीनामा देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Exit mobile version