। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या ताराराणी ब्रिगेड अध्यक्ष वंदना मोरे या विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. पोलीस बांधव तसेच कर्तव्यदक्ष अधिकारी हे सणाच्या दिवशी सुट्टी न घेता आपले कर्तव्य बजावत असतात. म्हणून ताराराणी ब्रिगेडकडून रक्षाबंधन निमित्ताने त्यांना राखी बांधून अनोखा उपक्रम राबवण्यात आला. तसेच, वाहतूक शाखेचे नियम न पाळणार्या दुचाकी, वाहन चालकांना थांबवून त्यांना रक्षाबंधन दिनानिमित्त सुरक्षाराखी बांधून वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे, तसेच विनाहेल्मेट प्रवास करणार्यांना राखी बांधून हेल्मेट वापरण्यासाठी शपथ देण्यात आली. तसेच, खालापूर स्टेशन मधील पोलीस बांधवांसोबत ही रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.